*शेख मोहम्मद शेख मुनीर याची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड* उमरखेड: तालुक्यातील शैक्षणिक,सांस्कृतिक,क्रीडा,संगीत,सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या स्टुडंट्स वेल्फेअर इंग्लिश मेडीयम स्कूल दहागाव या शाळेतील वर्ग १० वी चा विद्यार्थी शेख मोहम्मद शेख मुनीर याची निवड इंडियन क्रिकेट फेडरेशन द्वारा आयोजित चेन्नई येथे होत असलेल्या नॅशनल चॅम्पियनशिप २०१९ या क्रिकेट स्पर्धेकरिता महाराष्ट्र क्रिकेट संघात झाली असून हि निवड इंडियन क्रिकेट फेडरेशन विदर्भ द्वारा करण्यात आली आहे.हि स्पर्धा चेन्नई येथे खेळवली जात असून ह्याच विद्यार्थ्याने यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर १९ वयोगटा अंतर्गत अफगाणिस्थान विरुद्ध भारताच्या चमूत उत्कृष्ट कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिला होता.पुढील स्पर्धेचा प्रत्यक्ष सामना youtube Channel वर प्रसारित करण्यात येत आहे. त्याच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष दर्शन तुकाराम अग्रवाल, उपाध्यक्ष एन. आर. वड्डे, सचिव नितीन भुतडा,व्यवस्थापक आशिष लासिनकर, मु.अ.एम.पी.कदम,प्रशिक्षक सागर शेरे,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कौतुक करत आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 (सा)संत...