*शेतकरी म्हणून जगने कठीण झाले आहे* असे पत्रात नमूद करुण संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या करणारे महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांच्या या दुर्देवी सामुहिक आत्महत्येला ३३ वर्ष होत आहे त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाने त्वरित कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात या हेतूने पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील शेतकरी संघर्ष समिती,सावली जेष्ठ नागरिक मंडळ,ग्रामिण पत्रकार संघटना,व ईतर संघटनांनी दि.१९/३/२०१९ मंगळवारी सकाळी १० ते सांय ५ पर्यंत शेतकरी संघर्ष समिती कार्यालय शेंबाळपिंपरी येथे *एक दिवसीय सामुहिक अन्न त्याग आंदोलन* करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष रामकृष्ण चंदेल,कार्याध्यक्ष जैनुल सिद्दीकी,सावली जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष रेणूकादास जोशी,उत्तमराव ढोले,दिलीपराव देशमुख,मो.हनीफ पटेल,विजयकुमार वाकडे,डाॅ.राहूल सिरसाट,रविंद्र महल्ले,राजेश वाहूळे,उस्मान डाँगे,सुनिल वाहूळे,शमी कुरेशी,देविदास कांबळे,अय्युब खान,राजेश विनकरे,नागोराव राठोड,सऊद अहेमद,मोहन मनवर,अशोकराव कांबळे,नंदकुमार खरे आणि ईतर मंडळींनी आज दिनांक १४/३/२०१९ रोज गुरुवार ला उपविभागीय महसूल अधिकारी पुसद व तहसिलदार पुसद आणि ठाणेदार पोलीस स्टेशन खंडाळा O.P.शेंबाळपिंपरी यांना समक्ष भेटी द्वारे लेखी निवेदन देण्यात आले आहे.ःमूख्य संपादक शेख तहेसिन

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED