🙏🙏 *"करा पोलिसांना धन्यवाद"*🙏🙏
*सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड तर्फे पोलिस कृतज्ञता दीन साजरा*
उमरखेड:-(ता. प्र.)सामान्य नागरिक आणि पोलीस बांधव यांच्यातील सुसंवाद वाढून अपप्रवृत्तींना नैतिक धाक निर्माण व्हावा, पोलीस दल आणि सकारात्मक नागरिक सोबत आहेत हा संदेश संपूर्ण समाजात पोहचावा म्हणून आपण *‘ पोलीस कृतज्ञता दिन’* सत्यनिर्मिति महिला मंडल तर्फे दर वर्षी साजरा करत आहेत हे आपले पोलीस बांधवांप्रती कर्तव्य आहे.
*पोलीस वर्दीतील सामान्य माणुस आहे…*
आणि आपण सामान्य माणुस *बिनावर्दीतील पोलीस…*
आपले पोलीस आपले मित्र
पोलींसाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांचे प्रबोधन *अध्यक्षा सौ शबाना खान यांनी केले पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फुल,शॉल  आणि एक पेन भेट देऊन कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला.* पोलीस व समाज’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, *११ मे २०१९ हा दिवस ‘कृतज्ञता दिन’ म्हणून साजरा करण्यात आले* सामान्य नागरिक यांना सोबत घेऊन शहरातील सामाजिक समस्या व *सुधारणा* यावर चर्चा व प्रत्यक्ष उपाययोजना यासाठी सातत्याने विविध मोहिमा राबवत आहेत. हे शासन व समाज यांच्यातील एकात्मता व समन्वय याचं सर्वोत्तम उदाहरण होय. परिणामस्वरूप *आवाज प्रदूषण,* वाहतूक नियमन, नशाबंदी यासह अनेक गंभीर प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे, जी आपल्या शहरासाठी अत्यंत आनंदाची, समाधानाची व अभिमानाची बाब आहे.
     *या वेळी सत्यनिर्मिति महिला मंडल अध्यक्षा सौ शबाना खान,मानव अधिकार तालुका अध्यक्षा सौ राखी मगरे, महिला सुरक्षा दल जिल्हा अध्यक्ष इरफान पठान,ग्राहक मंच तालुका अध्यक्ष गोविंद सोमानी,एकता ऑटो यूनियन अध्यक्ष ताहेर अज़ीज़ शाह,ह्यूमन राइट जिल्हा उपाध्यक्ष अनीस पठान सर,तबस्सुम सय्यद,सौ सविता भगवत,सौ नसीम खान,कु भक्ति लांडगे,सौ सिमा खंदारे,सौ सरिता फूलोरे, सौ रेखा,पत्रकार समराण पठान,तहसीन शेख,वसीम सय्यद,गयाज़ पठान तसेच सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.*🙏🙏🙏🙏

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED